पेरणी करतानाच गुलाबी बोंड अळीचे व्यवस्थापन करा – NNL
नांदेड| गुलाबी बोंड अळीने अख्खी कपाशी वाया जाण्यापूर्वी काही छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले, तर कपाशीवर गुलाबी बोंड अळी येणारच नाही. त्यामुळे पेरणी करतानाच आपल्या कपाशीवर बोंड अळी येणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत जारी करण्यात आलेल्या सूचनांमध्ये बोंड अळी पासून संरक्षित असलेल्या व कृषी विभागाने शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी वाणांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतामध्ये बीटी कापसाच्या पूर्ण प्लॉट शेजारी नॉन बीटीची थोड्या प्रमाणात लागवड करण्याची सूचनाही कृषी विभागाने केली आहे .जमिनीत पूर्ण ओलावा आल्याशिवाय पेरणीला हात घालू नये असेही कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. याशिवाय नत्र खताचा वापर न करता जमिनीची पत तपासून ( मृदा परिक्षण ) खतांचा वापर करण्याची सूचना केली आहे.
कृषी वि...
