Padma Awards ;पद्म पुरस्कार 2025 साठी नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 – NNL
नवी दिल्ली| दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. ही प्रथा पुढे नेत यावर्षी ही पद्म पुरस्कारांची नामांकने, केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत प्रक्रिया 1 मे 2024 पासून प्रारंभ झाली असून, नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टवर ऑनलाईन सादर केली जातील
पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असून, कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान आणि अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार, औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी हे पुरस्कार दिले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक, वंश, व्यवसाय, स्तर, किंवा लिंगाचा अपवाद न करता, या पुरस्कारांसाठी पात्र आहे.
सर...
