peak insurance plan | एक रुपयात पीक विमा योजना काढण्याचे शेवटचे 4 दिवस बाकी -NNL
नांदेड| केवळ 1 रुपयामध्ये शेतातील पिकाचा पीक विमा काढला जातो. केंद्र व राज्य सरकार मोठ्या प्रमाणात यासाठी आर्थिक तरतूद करते. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी आपले पीक संरक्षित केले नसतील त्यांनी तातडीने पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
यासंदर्भात आज जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी व्हिडिओ संदेश जारी करतांना स्पष्ट केले की, गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ यावर्षी घेतला आहे. यावर्षी 97 टक्के पाऊस आतापर्यंत आला असून पिके संरक्षित करणे आवश्यक आहे. गेल्यावर्षी पीक विमा योजनेमध्ये 11 लाख शेतकऱ्यांनी भाग घेतला होता. मात्र यावर्षी गुरूवार 11 जुलै पर्यंत 7 लाख 45 हजार शेतकऱ्यांनीच पीक विमा योजनेचा लाभ घेतला आहे. या योजनेतून नांदेड जिल्ह्यामध्ये 400 कोटीपेक्षा अधिक लाभ शेतकऱ्यांना झाला आहे. योजनेची प्रभावी अंमल...
