Saturday, May 16

Tag: Keeping in mind the problems of 25 villages in Islapur area

Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

Sahasrakund ; इस्लापूर भागातील २५ गावांची अडचण लक्षात घेऊन सहस्त्रकुंड या ठिकाणी बंधारा उभारण्यासाठी प्रयत्नशील राहील

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे l महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिनांक २८रोजी किनवट तालुक्यातील इस्लापूर भागातील पर्यटनस्थळ स्थळ असलेले सहस्त्रकुंड ,परोटी, या भागाचा दौरा केला. सहस्रकुंड येथे सहस्रकुंड ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर व वाळकी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ सुनीता बळीराम चव्हाण यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. मोठ्या उत्साहात बंजारा समाजातील समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषा धारण करत त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन सोहळ्याच्या निमित्ताने परोटी तांडा या ठिकाणी हे आले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलत असताना परोटी हे गाव माझे आजूळ असून या गावाशी व किनवट तालुक्यातील जनतेशी माझी ऋणानुबंधाची संबंध आहेत. तेव्हा मी जरी या राज्याचा मंत्री असलो तरी तुमच्या आशीर्वादाने मंत...
error: Content is protected !!