Formar mp pratap patil chikhalikar ; कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करुन देणार – माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL
उस्माननगर, माणिक भिसे। कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाला पुर्वीचे वैभव प्राप्त करून देणार असल्याचे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सर्व सभासदाना ग्वाही दिली आहे. ते कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या वार्षिक सर्वसाधारन सभेचे ऊदघाटन त्यांच्या हास्ते करण्यात आले त्यावेळी ते बलताना म्हणाले. कंधार तालूका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाची वार्षिक सभा २८ सप्टेबर रोजी खरदे विक्री संघाच्या कार्यालयात घेण्यात आली.
या वार्षिक सभेच्या अध्यस्थानी कंधार तालूका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती प्राचार्य किशनराव डफडे सर होते तर उद्दघाटक म्हणून नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर होते. तर प्रमख पाहुने म्हणून बाबुराव केंद्रे उमरगेकर, दत्ता चंदनफूले, भगवान राठोड, संजय देशमुख, आण्णा साहेब कदम,दत्ता घोरबांड , राजू मुकन...
