Legal Services Authority’s work : कामगारांच्या हक्कासाठी विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य मोलाचे : सुरेखा कोसमकर -NNL
नांदेड| असंघटीत कामगांराना त्यांच्या हक्काची माहिती व्हावी, त्यांच्यासाठी असलेल्या कायद्याची माहिती ज्ञात होण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणामार्फत विविध जनजागृती कार्यक्रम घेण्यात येतात. हे कार्य खूप मोलाचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा प्रमुख न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा सुरेखा कोसमकर यांनी केले.
शोषित,असंघटित कामगारांना समस्या सोडविण्यासाठी व त्यांचे जीवन सन्मानपूर्वक जगण्यास मदत करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण देशपातळीपासून प्रत्येक घरा-घरापर्यंत पोहचले आहे. या हे विधी सेवा प्राधिकरणाचे कार्य आपल्या जिल्ह्यात आणखी बळकट करण्यात येणार आहे या माध्यमातून कामगारांना न्याय मिळणार असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
आज तुलसी कम्फर्ट नांदेड येथे मानवी हक्क दिनानिमित्त आयोजित कायदेविषयक शिबिराच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्ह...
