श्री गुरु अर्जनदेव जी महाराज यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने साजरा -NNL
नांदेड। शीख धर्माचे पाचवे गुरु, महान शहीद श्री गुरु अर्जुन देवजी यांचा शहीदी गुरपुरब भक्तिभावाने सोमवार दि. 10 जून रोजी गुरुद्वारा तखत सचखंड येथे साजरा करण्यात आला. गुरु अर्जुनदेवजी हे पवित्र पावन श्री गुरूग्रंथ साहबाचे निर्माते आहेत.
श्री गुरु अर्जुन देवजी महाराज यांच्या शहीदी गुरुपूरब निमित्त शहरात वेगवेगळ्या ठिकाणी शरबताचे वाटप करण्यात आले. तसेच गुरुद्वारा तखत सचखंड येथे श्री सुखमनी साहिबचे पाठ व कथा करण्यात आली. वरील कार्यक्रमाचे आयोजन येथील "गुरु का खालसा संस्थेच्या वतीने तसेच गुरुद्वारा बोर्डाच्या सहयोगाने करण्यात आले होते. गुरुद्वारा येथे शहीदी गुरुपूरबला समर्पित दि. 6 जुन ते 10 जुन 2024 दरम्यान दररोज रात्री 8 ते 10 वेळेत सुखमनी साहेबचे पाठ व कीर्तन कार्यक्रम पार पडले. पठण व प्रार्थनेनंतर गुरूंचा लंगर वाटप करण्यात आला. या वेळी पंजप्यारे सिंघसाहब भाई गुरमीत सिंघ पुजारी जी, कथाकार...
