मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा आयुक्त कार्यालयावर तीव्र निदर्शने
नांदेड l शहरातील पूरग्रस्तांच्या मागण्यासाठी सीटू कामगार संघटना, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना आणि डीवायएफआयचे मागील अनेक महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिके समोर बेमुदत साखळी उपोषण सुरु आहे.
जन संघटनांच्या मागण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने ६ नोव्हेंबर रोजी शकडो पूरग्रस्तांना घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय आणि मनपा आयुक्त यांच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात आले.
आंदोलक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले आणि अप्पर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांना निवेदन दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांची उपस्थिती होती.
माकपच्या शिष्टमंडळाच्या वतीने २०० पानाचे निवेदन अपर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. शहरातील हजारो पूरग्रस्त सानुग्रह अनुदानापासून वंचीत आहेत. आणि मनपाच्या वसुली लिप...
