on 26/11 Sainik Ho for you : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही २६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी…. NNL
नांदेड| मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या आठवणी जागवण्यासाठी व हल्ल्यातील शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी यावर्षी देखिल पत्रकार विजय जोशी यांची निर्मिती असलेला सैनिक हो तुमच्यासाठी.... या देशभक्तीपर गिताचा कार्यक्रम दि. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी डॉ.शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावर्षी प्रख्यात गायिका कल्याणी देशपांडे (अवघा रंग एक झाला....., स्टार प्रवाह-मी होणार सुपरस्टार फेम) या प्रमुख आकर्षण आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज कलावंत यात देशभक्तीपर गितांच्या रचना सादर करणार आहेत.
संवाद संस्था आणि नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, यावर्षीचा हा ५७ वा प्रयोग आहे. गेल्या सोळा वर्षापासून हा कार्यक्रम सातत्याने घेतला जात असून दरवर्षी नव्या कलावंताना संधी देतांनाच कार्यक्रमाची आखणी वेगवेगळ्या शैलीत केल...
