Participation of 50 children : “वात्सल्य” योजनेच्या राष्ट्रीय शुभारंभात नांदेड जिल्हयातील 50 बालकांचा सहभाग -NNL
नांदेड| केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन मुलांसाठीच्या “वात्सल्य” नावाच्या नव्या पेन्शन योजनेची सुरूवात आज 18 सप्टेंबरला झाली. नवी दिल्ली येथून झालेल्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्यातील 50 बालकांनी सहभाग घेतला त्यापैकी दहा बालकांना कायम निवृत्ती वेतन कार्ड देण्यात आले. नांदेड जिल्ह्याचा 50 बालकांना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे संबोधन ऐकायला मिळाले.हा कार्यक्रम नांदेड येथील केंद्रीय विद्यालयात ऑनलाईन घेण्यास आला.
नांदेड जिल्हा अग्रणी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आणि ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था यांच्या विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक कालिदासू पक्काला, सहमहाव्यवस्थापक यु. सुरेश बाबू, केंद्रीय विद्यालयाचे प्राचार्य अशोक कुमार विश्वकर्मा, केंद्रीय विद्यालयाचे मुख्याध्यापक राम शृंगारे...
