Police Action : मनाठा पोलिसांची धडाकेबाज कारवाई पानबुडी विद्युत मोटारी चोरी प्रकरणी 6 आरोपी अटकेत
नांदेड, विशेष प्रतिनिधी | मनाठा पोलीस ठाण्याच्या हद्दीत (पाणबुडी) विद्युत मोटारींची चोरी करून त्यांची विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीला मनाठा पोलिसांनी रंगेहात पकडत ४ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस ठाणे मनाठा येथे गुन्हा क्रमांक 11/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 303(2), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हा दि. 14 जानेवारी 2026 रोजी पहाटे 12.30 वाजता पिंपरखेड ते बामणी रस्त्यावर घडल्याची नोंद आहे.
गोपनीय माहितीतून कारवाई
पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांच्या आदेशानुसार चोरीच्या मालमत्ते विरोधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन फ्लश आऊट’ अंतर्गत कारवाई सुरू असताना, मनाठा पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यावरून पोलिसांनी पिंपरखेड–बामणी रस्त्यावरून काही इसम चोरीच्या पान...
