Meenal Karanwal : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात ग्रामपंचायतींनी सहभाग घ्यावा – मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल -NNL
नांदेड,गोविंद मुंडकर| ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यांसाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून दिनांक 11 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत परिसर स्वच्छता आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान हे अभियान राबविण्यांत येणार आहे. या अभियानात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग घ्यावा, असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी केले आहे.
गावागावात निर्माण होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मत परिवर्तन व स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व ग्रामस्थांचा सक्रिय व सातत्यपूर्ण सहभाग घेणे हे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानाचे वैशिष्ट्य आहे. राज्यातील ग्रामपंचायती, तालुके व जिल्हयांत स्वच्छतेच्या विविध पैलूतील प्रगतीबाबत एक सर्व...
