National school chess tournament : राष्ट्रीय शालेय बुध्दीबळ स्पर्धेत महाराष्ट्र मुलींच्या संघास सुवर्ण तर मुलाच्या संघास रौप्य पदक
नांदेड| गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये (National school chess tournament) मुलींच्या महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. तर मुलांच्या संघात रौप्य पदक मिळाले आहे. नांदेड येथे सुरू असलेल्या शालेय बुद्धिबळ स्पर्धेचा समारोप झाला.
आयुक्त, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे मान्यतेने जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नांदेड, महाराष्ट्र बुध्दीबळ असोसिएशन व नांदेड जिल्हा बुध्दीबळ असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने सन 2024-25 या वर्षातील राष्ट्रीयस्तर शालेय बुध्दीबळ (14 वर्षे मुले-मुली) क्रीडा स्पर्धेचे आयोजन दि. 20 ते 24 जानेवारी, 2025 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, इनडोअर हॉल,नांदेड येथे संपन्न झाले.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. डॉ. महेशकुमार डोईफोडे (आयुक्त, नांदे...
