Gram Panchayat Sarpanch : नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण 1 जुलै 2025 रोजी काढण्यात येणार
नांदेड| नांदेड तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच पदाचे वर्ष 2025 ते 2030 साठी आरक्षण सोडत 1 जुलै 2025 रोजी सकाळी 10 वा. तहसिल कार्यालय नांदेड (उपविभागीय अधिकारी नांदेड यांच्या बैठक कक्षात दुसरा मजला) येथे काढण्यात येणार आहे. सरपंच पदाचे आरक्षणात नांदेड तालुक्यात एकुण राखीव 73 पदांपैकी 37 महिलांसाठी राखीव पदे आहेत. सर्व संबंधीतानी तसेच माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी या सोडतीस उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार नांदेड
नांदेड जिल्हाधिकारी यांची अधिसूचना 23 जून 2025 नुसार नांदेड तालुक्यातील बिगर अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग आणि स्त्रिया यांच्यासाठी राखून ठेवावयाची सरपंचाची पदे मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियम 1964 च्या नियम 2 अ चे पोटनियम 3 व 4 अन्वये जिल्हाधिकारी ना...
