Friday, June 26

Tag: in house burglary busted in Nanded

house burglary : नांदेडमध्ये घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात; 7.28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

house burglary : नांदेडमध्ये घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात; 7.28 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

क्राईम, नांदेड
नांदेड| नांदेडमध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यवाहीत घरफोडी करणारी आंतरजिल्हा टोळी जाळ्यात अडकली आहे. पोलिसांनी मंगल ज्ञानेश्वर चव्हाण (26, रा. गौतमनगर सांगवी), श्रीनिवास शिवाजी चव्हाण (20, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) आणि प्रताप गब्बरसिंग राठोड (20, रा. सोनारी, ता. हिमायतनगर) या तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपासात आरोपींकडून सोनं व चांदीचे दागिने तसेच एकूण 7,28,339 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींनी नांदेड जिल्ह्यातील जामगा शिवनी, कोलंबी, इकळीमोर, नायगाव, कुंडलवाडी, बारड, लिंबगाव आणि देगलूर या भागातील घरफोडी केले असल्याची कबुली दिली आहे. ही कारवाई “फलश आउट” ऑपरेशन अंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करण्यात आली. सदर कामगिरीसाठी पोलीस अधीक्षक नांदेड, अविनाश कुमार यांनी अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक केले आहे....
error: Content is protected !!