Saturday, June 27

Tag: in a sack thrown into a well

Murder news : प्रेम प्रकरणातून युवकांचा खून करून पोत्यात बांधलेले प्रेत विहिरीत टाकले;  कांडली (बु.) येथील बापलेकास अटक

Murder news : प्रेम प्रकरणातून युवकांचा खून करून पोत्यात बांधलेले प्रेत विहिरीत टाकले; कांडली (बु.) येथील बापलेकास अटक

नांदेड, क्राईम
हदगाव/हिमायतनगर/ नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील कांडली (बु.) येथे एका तरुणाचा प्रेम प्रकरणातून अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून करून प्रेत भोकर तालुक्यातील सिंगारवाडी शिवारातील विहिरीत टाकण्यात आले. ही घटना २८ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली असून परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत तरुणाचे नाव नकुल संजय पावडे (१७, रा. कांडली बु.) असे आहे. तो संभाजीनगर येथे शिक्षण घेत होता व दिवाळीनिमित्त गावाला आला होता. मात्र, २६ ऑक्टोबरच्या रात्रीपासून तो बेपत्ता होता. मुलगा घरी परतला नाही म्हणून वडील संजय शिवाजी पावडे यांनी नातेवाईकांसह शोध घेतला. तो न सापडल्याने २७ ऑक्टोबर रोजी तामसा पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास सुरू करताच स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने संशयितांवर लक्ष केंद्रित केले. तपासाअंती पोलिसांनी गणेश संभाजी दारेवाड (३९...
error: Content is protected !!