Veerashaiva Lingayat majority constituency ; वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला ‘नोटा’ चा पर्याय उपलब्ध ! – NNL
मुंबई | देशाच्या जडण-घडणीमध्ये वीरशैव लिंगायत समाजाचे स्वातंत्र्यपूर्व काळापासून मोठे योगदान राहिलेले आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात देखील त्यांच्या वित्त, सामाजिक आणि धार्मिक विभागांची जबाबदारी वीरशैव लिंगायत समाजातील घटकांवरच असल्याचे पुरावे मिळतात. अलीकडे स्वतंत्र्योत्तर काळात देखील देशाच्या राजकीय जडण-घडणी मध्ये वीरशैव लिंगायत आणि जंगम समाजाचे महत्वपूर्ण योगदान राहिलेले आहे. अगदी सुरुवातीला आणि त्यानंतर काही कालावधी वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत.
मात्र नंतरच्या कालावधीत बदलत्या राजकीय पस्थितीचा फार मोठा फटका वीरशैव लिंगायत समाजालाच बसलेला आहे. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर प्रारंभ...
