Cm devendra fadanvis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सोशल मीडिया जिल्हा संयोजकाचा सन्मान -NNL
नागपूर/हिमायतनगर। विधानसभा 2024 निवडणूक काळात नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या सोशल मीडिया पदाधिकाऱ्यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि 19 डिसेंबर रोजी सिपी क्लब, नागपूर येथे आयोजित विशेष बैठकित मार्गदर्शन केले. तसेच नांदेड उत्तरचे सोशल मीडिया जिल्हा संयोजक नागेश शिंदे, नांदेड महानगरचे उमेश सरोदे यांचा सन्मान केला आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने फेक निरेटिव्ह पसरवून मतदारांची दिशाभूल केल्यामुळे महायुतीला फटका बसला होता. याचे सूक्ष्म निरीक्षण करून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया व आयटी सेलने संपूर्ण महाराष्ट्रभर विधानसभा क्षेत्रात प्रदेश कार्यालयाकडून आलेल्या सूचनांचे पालन केल्यामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार...
