List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता, मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या http://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर 2024 पर्यत सकाळी 10 ते 17 या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आनंद नगर रोड, हर्ष नगर येथे स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या homeguardnanded@gmail.com या मेलवर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/आक्षेप यांची नोंद घेतली जाणार नाही असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले आहे.
जाहीर केलेल्या यादीतील उमेदवांराच्या नावासमोर तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण दर्शविण्यात आलेले आहेत...
