Friday, June 26

Tag: Himayatnagarat Motarichya Copper Cable

Copper Cable : हिमायतनगरात मोटारीच्या कॉपर केबल चोरट्यांचा हैदोस

Copper Cable : हिमायतनगरात मोटारीच्या कॉपर केबल चोरट्यांचा हैदोस

क्राईम, नांदेड, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| शहर व परिसरात शेतीतील मोटार पंपाच्या केबल चोरीच्या घटनांनी शेतकरी वर्ग अक्षरशः त्रस्त झाला आहे. ऐन रब्बी हंगाम सुरू असताना शेतकऱ्यांच्या शेतातील सोलार व वीजेवर चालणाऱ्या मोटारींच्या कॉपर केबल्स चोरट्यांनी तोडून नेल्याने सिंचन व्यवस्था कोलमडली आहे. अस्मानी संकटांनी आधीच हैराण झालेल्या शेतकऱ्यांवर आता चोरट्यांच्या हैदोसाचे नवे संकट कोसळले आहे. मागील महिन्याभरात हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत केबल चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बुधवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी अनेक शेतात धडक दिली. हिमायतनगर परिसरात असलेले शेतकरी संतोष गाजेवार, गजानन वारकड, केशव परमेश्वर कुपटे, गणेश गुंडेवार, धरमपुरी तालेवार, रामु नरसिंगा चाटलेवार, सुभाष वारकड, संजय मुधोळकर यांच्यासह 20 ते 25 शेतकऱ्यांच्या शेतातील मोटार पंपाचे कॉपर केबल कुऱ्हाड किंवा अन्य धारधार शस्त्राने तोडून चोरून ...
error: Content is protected !!