BJP district general secretary Gajanan Tuptewar : हदगाव हिमायतनगर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई द्या – भाजपा जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार -NNL
नांदेड,अनिल मादसवार| हदगाव - हिमायतनगर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कोणत्याही प्रकारचे पंचनामे करणे करता हदगाव हिमायतनगर तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गजानन तुपतेवार यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात दिनांक 1 सप्टेंबर 2024 रोजी प्रचंड अतिवृष्टी झाली. वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन झालेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला. या पुराच्या पावसामुळे शेती पिकात पाणी साचून राहिल्याने कापूस, सोयाबीन, तूर, ज्वारी, हळद आदींसह इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल...
