Friday, June 26

Tag: Gutkha mafiya

DIG Police Action : गुटखा माफियांना जबर धक्का : डीआयजींच्या थेट नियंत्रणाखाली कारवाई

DIG Police Action : गुटखा माफियांना जबर धक्का : डीआयजींच्या थेट नियंत्रणाखाली कारवाई

नांदेड, क्राईम, परभणी, हिंगोली
नांदेड, अनिल मादसवार| “गुटखा विक्री थांबणारच” असा ठाम इशारा देत पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या थेट नियंत्रणाखाली राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेमुळे हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील गुटखा माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सलग छाप्यांत ७३ लाख रुपयांचा अवैध गुटखा आणि एकूण १ कोटी ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी तस्करीच्या साखळीला जोरदार हादरा दिला. विशेष पथकाने हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी परिसरात गोपनीय माहितीच्या आधारे छापा टाकत १४ लाख ६७ हजार रुपयांचा गुटखा जप्त केला. यासोबतच गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या १० लाख रुपये किंमतीच्या तीन चारचाकी वाहने ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी संबंधित आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर पथकाने मोर्चा वळवला नांदेड शहरातील द्वारका भागाकडे. येथे एका गोदामावर टाकलेल्या छाप्यात ५८ लाख २६ हजार रुपयांचा गुटखा आ...
error: Content is protected !!