Malegaon yatra 2 january ; राष्ट्रीय दुखवट्यामुळे माळेगावातील शासकीय कार्यक्रम 2 जानेवारीपासून -NNL
नांदेड। भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे संपूर्ण देशात 26 डिसेंबर ते एक जानेवारी ( दोन्ही दिवस पकडून )सात दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे 29 डिसेंबर पासून सुरु होणाऱ्या माळेगाव येथील यात्रेतील शासकीय कार्यक्रम २ जानेवारीपासून घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी या संदर्भात आज जारी केलेल्या पत्रकामध्ये हा बदल जाहीर केला आहे. माजी प्रधानमंत्री यांचा दुखवटा एक जानेवारीला संपल्यानंतर 2 जानेवारीपासून नियमित नियोजित कार्यक्रम नव्या वेळापत्रकानुसार होतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दक्षिणेतील सुप्रसिद्ध माळेगाव यात्रेतील शासकीय कार्यक्रमांचे आयोजन नांदेड जिल्हा परिषद, लोहा पंचायत समिती व माळेगाव ग्रामपंचायत मार्फत केला जाते.
पालखी २९ डिसेंबरलाच - त...
