The launch of ‘Yuva Umed’ : अॅड. श्रीजया चव्हाण यांच्या संकल्पनेतून ‘युवा उमेद’चा शुभारंभ -NNL
नांदेड| रोजगार व स्वयंरोजगाराची संधी शोधणाऱ्या इच्छूक मुला-मुलींना माहिती, मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ नामक एक व्यासपीठ सुरु केले असून, या अभिनव उपक्रमाचा आज अर्धापूर येथे शुभारंभ करण्यात आला. सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर यांच्या व्याख्यानाने या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला अॅड. श्रीजया चव्हाण, सेवानिवृत्त कर्नल रमेश पुणेकर, भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण, अॅड. सुभाष कल्याणकर उपस्थित होते. ‘युवा उमेद’ उपक्रमाच्या उद्घाटनीय कार्यक्रमात रमेश पुणेकर यांनी भारतीय सैन्य दलातील विविध संधींविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तत्पूर्वी अॅड. श्रीजया चव्हाण यांनी ‘युवा उमेद’ ही संकल्पना उलगडून सांगितली. 'मेहनत तुमची, मद...
