Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग ९ (लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
“गुलमर्गच्या सृष्टीसौंदर्यात हरवलेली ती अखेरची शांतता…”
सकाळी ७ वाजता, सर्व यात्रेकरू गुलमर्ग कडे जाण्यास सज्ज झाले. काश्मीरच्या सुंदर दऱ्या-खोऱ्यातील थंड व स्वच्छ वातावरण, सुचीपर्णी व चिनार वृक्षांची दाटी अंगावर अलगद फुलपाखरासारखी येऊन जाई. पहाटेच्या अल्लड हवेत त्या हिरवाईचा वास आणि पर्वतांचं मौन मंत्रपठण करत होतं… जसा ऊन वाढू लागला तसा थोडासा उकाडा जाणवू लागला,पण आमच्या AC गाड्यांमुळे त्याचा फारसा त्रास झाला नाही.
गुरु पौर्णिमा आणि छोले भटुरे
प्रवास चालू असताना मला भाजपा महानगर अध्यक्ष अमर राजुरकर यांचा मेसेज आला.”गुरु पौर्णिमे निमित्त सर्व भाजप पदाधिका-यानी आपल्या परिसरातील गुरुजनाँचे पूजन करावे.” मी तर अमरनाथ यात्रेत होतो. कारण पक्षाने दिलेले सर्व आदेशाचे मी काटेकोर पने पालन करीत असतो.मागे मन की बात चा कार्यक्रम मी अंदमान टूर मध्ये क्रूज मध्ये घेतला होता.मागच्या महिन्यात रत्नेश्व...
