Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून – भाग १२ (लेखक : धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
"श्रद्धा, राष्ट्रभक्ती आणि निःस्वार्थ सेवेचं उत्कट दर्शन!"
माता वैष्णोदेवीचे यशस्वी दर्शन झाल्यानंतर सर्वजण भावनांनी ओथंबलेले! हॉटेल 'श्रीन ग्रँड'मधील आरामदायी वास्तव्यानंतर सकाळी ८ वाजता आम्ही आमच्या बसने जम्मूकडे रवाना झालो.अत्यंत हुशार आणि मनमिळावू असलेल्या शार्दूल वडजकर या तरुण इंजिनियरची सुट्टी संपत आल्यामुळे त्याला निरोप द्यावा लागला. प्रवास सुरू झाल्यावर लगेचच वसुबेन पटेल आणि शंकर मोरलवार यांनी घेतलेल्या तंबोला गेममुळे एक तास कसा गेला, ते कळलेच नाही. त्यात रोख बक्षिसेही होती.
जम्मू बायपासवर दरवर्षीप्रमाणे आम्हाला प्रेमळ निमंत्रण देणारे मूळचे नांदेडचे, पण आता जम्मूत स्थायिक झालेले लेबर कॉन्ट्रॅक्टर ज्ञानोबा जोगदंड यांनी दिलेल्या गरमागरम दाल-चावल आणि तुपातला शिरा यांचा आस्वाद घेतला. फक्त २१ व्या वर्षी घरची गरिबी दूर करण्यासाठी कामगार म्हणून आलेल्या जोगदंड यांनी आपल्या कष्टातून आज ...
