Nanded : नांदेड मध्ये पहिल्यांदाच खुल्या मंचावर सादर झाली देशभक्ती गीतं
नांदेड| भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी ६ वाजता डॉ. शंकरराव चव्हाण पुतळ्यासमोर तिरंगा ध्वजाच्या खाली खुल्या मंचावर आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर गीतांनी वातावरण तिरंगामय झाले होते. एकाहून एक काळजाला भिडणार्या देशभक्तीच्या गीतांनी उपस्थित भारावले. डॉ. दिलीप शिंदे व सहकार्यांच्या संकल्पनेतून नांदेड शहरातील खुल्या मंचावर देशभक्ती गीतांचा हा कार्यक्रम पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. या आगळ्यावेगळ्या देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमास नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक देविदास फुलारी, दैनिक प्रजावाणीचे संपादक शंतनु डोईफोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पत्रकार राम तरटे, सतीश जैन, दिनकर जोशी आदी मान्यवरांची उपस्थिती होती. वायु दलातील निवृत्त सार्जंट स्व. सुरेंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ खुल्या मंचावर आयोजित करण...
