Elections : श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीची निवडणूक जाहीर
नांदेड| श्रीवेद मल्टी-स्टेट को-ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटी लि., बी-5, विष्णु कॉम्पलेक्स, हॉटेल ताज पाटील जवळ आय.टी.आय. नांदेडची निवडणूक जाहीर करण्यात आली असून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत आज यासंदर्भातील माहिती जारी करण्यात आली.
ॲसीस्टंट रजिष्टार, को-ऑपरेशन, सी.ई.ए. (को-ऑपरेटीव्ह इलेक्शन ॲथोरेटी) 9 वा मजला, टावर-ई, वर्ल्ड ट्रेड सेंटर, नौरोजी नगर, दिल्ली-110029 यांनी त्याचे पत्र दिनांक 17 जून 2025 नुसार सदर संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणुक घेणेसाठी निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांची नियुक्ती केली आहे. संस्थेच्या निवडणूक कार्यक्रमानुसार एकूण 11 संचालक निवडून द्यावयाचे असून त्यामध्ये सर्वसाधारण मतदार संघातुन आठ, अनुसूचीत जाती/जमाती मतदार संघातून एक आणि महिला राखीव मतदार संघातून दोन संचाल...
