Incessant rains cause : सततच्या पावसामुळे कपाशी पिकावर मररोग ; प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी तातडीचा सल्ला
नांदेड, अनिल मादसवार| महाराष्ट्र तथा मराठवाडा विभागामध्ये कापूस लागवडीच्या भागात मागील आठ-दहा दिवसांपासून सततचा पाऊस पडत आहे. तसेच काही भागात अतिवृष्टी झाली आहे. ज्या भागात पाऊस झाला आहे तिथल्या जमिनीवर बराच काळ पाणी साचलेले दिसत आहे. या परिस्थितीमुळे इतर खरीप पिकांसोबतच कापूस पिकाचे सुद्धा नुकसान झाल्याचे दिसत आहे. जास्त पाऊस झालेल्या शेतामध्ये दीर्घ काळापर्यंत पाणी साचून राहिल्यास त्याचा कापूस उत्पादनावर विपरीत परिणाम होऊ शकतो. मागील आठवड्यात झालेल्या सततच्या पावसामुळे कापूस पिकामध्ये पाणी साचल्यामुळे कापसाच्या झाडाची पाने मलूल होऊन झाडानी मान टाकल्यासारखी लक्षणे दिसत आहेत.
ही आकस्मिक मर विकृती असून यामुळे प्रादुर्भाग्रस्त झाडे पूर्णत: वाळण्याची शक्यता असते. जमिनीत वाफसा नसल्यामुळे आकस्मिक मर प्रादुर्भावग्रस्त झाडांमध्ये मुळाद्वारे अन्नद्रव्ये शोषण होत नाही. त्यामुळे झाडे कोमेजतात. पा...
