Link your Aadhaar with Bank Account : लाडकी बहीण योजनेसाठी आपले आधार बँकेच्या खात्याशी संलग्न करा – जिल्हाधिकारी -NNL
नांदेड| मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला महिलांनी अधिक पसंती दिली असून या योजनेत जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाखांच्या जवळपास महिलांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी 4 लाख 59 हजार 317 अर्ज मंजूर असून त्यांची टक्केवारी 97.11 एवढी आहे. तर आजच्या दिवशी पर्यंत जिल्हा समितीने मान्यता दिलेल्या अर्जाची एकूण संख्या 4 लाख 56 हजार 585 आहे. या योजनेत ज्या महिलांनी अर्ज केलेले आहेत परंतु त्यांचे बँक खाते आधार संलग्न करणे बाकी आहे अशा महिलांनी तात्काळ त्यांचे आधार संलग्नीकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना येत्या 17 ऑगस्टला जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे एकूण तीन हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. तसेच महिलांनी या योजनेतील अर्जात नमूद केलेले बँक खाते आधार संलग्न केले आहे की नाही यांची खातरजमा कराव...
