Friday, June 26

Tag: first woman doctor in Baradshewala

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

Woman Doctor : भाजीविक्रेत्याची मुलगी ठरली बरडशेवाळा येथील पहिली महिला डॉक्टर

करियर, नांदेड
हदगाव, गौतम वाठोरे | “जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची जाणीव असेल तर गरिबी देखील स्वप्नांच्या आड येऊ शकत नाही” हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे बरडशेवाळा (ता. हदगाव) येथील स्नेहा बालाजी सोळंके हिने. दिवसभर भाजीविक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे बालाजी नारायण सोळंके आणि आईच्या कष्टांत वाढलेली स्नेहा गावातील पहिली महिला एमबीबीएस डॉक्टर बनली आहे. तिचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झाले. अभ्यासात नेहमीच आघाडीवर असलेल्या स्नेहाने नवोदय परीक्षेत यश मिळवत पुढील शिक्षण घेतले. घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत तिने दहावीत ९६ टक्के गुणांसह शाळेत दुसरा क्रमांक पटकावला. बारावीनंतर तिने NEET परीक्षेद्वारे नाशिक येथील डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला. लहानपणीचे डॉक्टर होण्याचे स्वप्न तिने आई-वडिलांच्या कष्टातून साकारले आणि आज त्या दोघांचे डोळे अभिमानाने पाणावले. ...
error: Content is protected !!