Friday, June 26

Tag: Farmer’s son’s eagle leaps; Prajwal Piskewar passes MBBS exam with first class

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

MBBS exam ; शेतकरी पुत्राची गरुडझेप; प्रज्वल पिस्केवार एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण

कृषी, नांदेड
हिमायतनगर | हिमायतनगर तालुक्यातील सिरंजनी येथील शेतकरी कुटुंबातील होतकरू युवक प्रज्वल नर्सिंग पिस्केवार याने वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस (MBBS) पदवी परीक्षेत प्रथम श्रेणीसह विशेष प्राविण्य मिळवत घवघवीत यश संपादन केले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवलेल्या या यशामुळे संपूर्ण तालुक्यात त्याचे कौतुक होत आहे. प्रज्वलचे प्राथमिक शिक्षण सिरंजनी येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. ग्रामीण भागात शिक्षण घेत असतानाही त्याने वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहिले आणि जिद्द, चिकाटी व कठोर परिश्रमाच्या जोरावर ते स्वप्न पूर्ण केले. त्याने बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, डेरवण (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले असून सन २०२५ मध्ये एमबीबीएस परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत डॉक्टरी क्षेत्रात यशस्वी पाऊल टाकले ...
error: Content is protected !!