District Collector : विद्युत पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घ्या : जिल्हाधिकारी
नांदेड| सध्या नांदेड जिल्ह्याचा पारा 43 अंशाच्या जवळपास असून हवेत प्रचंड उकाडा वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांची विजेची मागणी वाढली असून पुरवठा कमी पडत आहे. त्यामुळे वारंवार विज पुरवठा बंद पडण्याच्या घटना वाढल्या आहेत. याबाबत महावितरण विभागाने आवश्यक त्या उपाययोजना करुन विद्युत पुरवठा सुरळीत राहील यांची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात महावितरण विभागाच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, अधिक्षक अभियंता सुधाकर जाधव, कार्यकारी अभियंता विनय बहादूर, रुमदेव चव्हाण, मंगेश बोरगावकर तसेच महावितरण विभागाच्या अधिकारी कर्मचारी आदीची उपस्थिती होती.
यावेळी मान्सूमपुर्व कामे प्राधान्याने करा, विजेच्या समस्याबाबत ग्राहकांशी, नागरिकांशी सुसंवाद ठेवा. उपकेंद्राची रोहित्र क्षमता वाढवि...
