Elections : वसमत नगर परिषद तसेच हिंगोलीतील दोन प्रभागांच्या निवडणुका स्थगित
हिंगोली| मा. न्यायालय व राज्य निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार वसमत नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक तसेच हिंगोली नगर परिषदेच्या दोन प्रभागांतील निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने सुधारित वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे.
वसमत नगर परिषद : संपूर्ण निवडणूक स्थगित - वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी ३ तर सदस्य पदासाठी ७ उमेदवारांनी दाखल केलेल्या अपीलवर मा. न्यायालयाने २५ नोव्हेंबर २०२५ रोजी निकाल दिला. या अपीलांवरील निर्णय उशिरा लागल्याने उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी उमेदवारांना उपलब्ध झाला नाही. परिणामी संपूर्ण नगरपरिषदेची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून सुधारित कार्यक्रम जारी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
या सुधारित का...

