मुलांची पाहिली कमाई आणि भावनिक झालेले पालक ! मराठा समाजासाठीच्या योजनेचे ‘सारथी’चे प्रशिक्षणानंतरचे दमदार सादरीकरण -NNL
नांदेड| सरसेनापती वीर बाजी पासलकर “शिकता शिकता कमवा” या योजने अंतर्गत आज एका अभिनव उपक्रमात विद्यार्थ्यांच्या पहिल्या कमाईतून आपल्या आई-वडिलांना मुलांनी भेटवस्तू दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडतकर यांच्या उपस्थितीत हा भावनिक कार्यक्रम लक्षवेधी ठरला.
नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांनी आज या उपक्रमात आपल्या पालकांसह सहभाग नोंदवला होता. मुला मुलींच्या पहिल्या कमाईतील पैशातून आपल्याच आई-वडिलांना भेटवस्तू देण्याचा हा कार्यक्रम एक भावनिक सोहळा झाला.
छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी पुणे मार्फत एमकेसीएलच्या माध्यमातून संगणक प्रशिक्षण केंद्रद्वारे दिनांक 1 फेब्रुवारीपासून छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व व संगणक कौशल्य कार्यक्रम सहा महिन्याचा डिप्लोमा कोर्...
