Friday, June 26

Tag: during the Malegaon Yatra

Malegaon Yatra : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा माळेगाव यात्रेत सत्कार

Malegaon Yatra : आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा माळेगाव यात्रेत सत्कार

नांदेड, महाराष्ट्र
श्रीक्षेत्र माळेगाव यात्रा| आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत विवाह करणाऱ्या जोडप्यांना ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य व संसारोपयोगी वस्तू देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेंतर्गत माळेगाव यात्रेनिमित्त आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या प्रणिताताई देवरे- चिखलीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार, कृषी विकास अधिकारी डॉ. नीलकुमार ऐतवडे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचा यावेळी पन्नास हजार रुपयांचा धनादेश, प्रमाणपत्र व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये दीपक शंकरराव दवणे- मयुरी रवींद्र बारंगे, शिवशंकर व्यंकटराव मुळे- सुरेखा बाबुराव उधारे, पद्माकर यादगि...
bulls won the animal exhibition : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी

bulls won the animal exhibition : माळेगाव यात्रेतील पशुप्रदर्शन स्पर्धेत शेतकरी विनायक थोरात यांच्या देवणी वळूंनी मारली बाजी

नांदेड, कृषी
नांदेड| जिल्ह्यातील माळेगाव यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पशुप्रदर्शन स्पर्धेत मराठवाड्याचे भूषण मानल्या जाणाऱ्या देवणी जातीच्या वळूंनी बाजी मारली आहे . लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील उजळंब येथील शेतकरी विनायक श्रीमंतराव थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी या स्पर्धेत बाजी मारली. या स्पर्धेत एक वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक तसेच एक वर्षावरील गटात द्वितीय क्रमांक असे दोन्ही पारितोषिके विनायक थोरात यांच्या देवणी जातीच्या वळूंनी पटकावून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. देवणी जातीची वैशिष्ट्ये, उत्तम बांधा, चांगले आरोग्य व शुद्ध वंश या गुणांच्या आधारे परीक्षकांनी या वळूंना विशेष गुण दिले. या यशामुळे देवणी जातीच्या गोवंश संवर्धनाला चालना मिळाली असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. माळेगाव यात्रेतील या पशुप्रदर्शन स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील देशी गोवंश...
District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

District Collector Rahul Kardile : माळेगाव यात्रेत भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| दक्षिण भारतात प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील श्री खंडोबा देवस्थान, माळेगाव यात्रा दिनांक 18 ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये, सर्व सुविधा अखंडित पुरवल्या जाव्यात, यासाठी सर्व संबंधित विभागांनी सूक्ष्म नियोजन करून समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते. पहिल्या दिवशी देवस्वारी – दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन - यात्रेच्या पहिल्या दिवशी (18 डिसेंबर) देवस्वारी आणि पालखी पूजन होणार असून दुसऱ्या दिवशी पशुप्रदर्शन आणि दुग्धस्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या संपूर्ण कालावधीत भाविकांसाठी आवश्यक सुविधा प्रशासनाद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पशुसंवर्धन, कृषी, पोलीस, बीएसएनएल...
error: Content is protected !!