Farmer’s house burnt down : आदमपुर येथे शॉर्टसर्किटने शेतकऱ्याचे घर जळून १० लाखाचे नुकसान
देगलूर, गंगाधर मठवाले| बिलोली तालुक्यातील आदमपूर येथील शेतकरी गोविंद महादू देवारे यांच्या माधव देवारे या मुलाच्या नावे असणाऱ्या घरात महावितरण कंपनीच्या जिवंत तारेच्या शॉर्टसर्किटमुळे सोमवार २१ रोजीच्या मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास आग लागून घरातील रोक रक्कम दाग -दागिनेसह संसार उपयोगी वस्तू व धान्य जळून तब्बल दहा लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.
येथील अल्पभूधारक शेतकरी गोविंद महादू देवारे हे अनेक वर्षापासून काबड कष्ट करीत आपल्या नागनाथ व माधव या दोन मुलांसाठी मागील पाच वर्षांपूर्वी नवीन घर बांधकाम केले. त्या घराच्या लगत गावाला विद्युत पुरवठा करणारा विद्युत पोल आहे. त्यावर जिवंत तारे ओढलेले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात विजेचा लपंडाव सुरू असल्याने घरातील सर्वजण घराच्या छतावर झोपले असताना मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच लोंबकाळणाऱ्या तारेच्या घर्षण होत शॉर्टसर्किटचे ठिणग्या पडत सदर ...
