Sunday, June 28

Tag: due to leopard activity

leopard : बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

leopard : बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड/हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील विविध ग्रामीण भागांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाच्या उपवनसंरक्षक, वनविभाग – नांदेड यांनी नागरिकांना विशेष सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. टेंभीसह परिसरातील गावांमध्ये बिबट्याच्या हालचाली आढळून येत असून, वनविभागाने शेतकरी आणि ग्रामस्थांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. वनविभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, शेतकऱ्यांनी रात्री शेतात पाणी देण्यासाठी जाताना समूहानेच जावे तसेच हातात काठी आणि मानेभोवती जाड कापड बांधावे. मोबाईलवर गाणी किंवा आवाज करणारी साधने वाजवत जावे, ज्यामुळे बिबट्या दूर राहण्याची शक्यता वाढते. वनक्षेत्रात किंवा गावाजवळील उघड्यावर शौचास जाणे धोकादायक असल्याचेही विभागाने स्पष्ट केले आहे. शाळकरी मुलांनी समूहानेच शाळेत जाणे आवश्यक असून, पालकांनी मुलांच्या सुरक्षेची विशेष का...
error: Content is protected !!