Friday, June 26

Tag: don’t go to rivers and streams”

don’t go to rivers : “मुलाबाळांची काळजी घ्या – नदी-नाल्यावर जाऊ नका”

don’t go to rivers : “मुलाबाळांची काळजी घ्या – नदी-नाल्यावर जाऊ नका”

नांदेड, सोशल वर्क
उस्माननगर ( माणिक भिसे) मागील महिनाभरापासून जिल्ह्यात मुसळधार पावसासह वीजांचा कडकडाट व ढगफुटी सदृश्य परिस्थिती सुरू आहे. त्यामुळे नदी, नाले, तलाव व विहिरी तुडुंब भरून वाहत असून पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेषतः मुलाबाळांची काळजी घ्यावी, नदी-नाल्यावर किंवा विहिरी-तलावाकडे त्यांना जाऊ देऊ नये, असे आवाहन उस्माननगर पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष सपोनि संजय निलपत्रेवार व ग्राम महसूल अधिकारी हिवंत पाटील यांनी केले आहे. पूरस्थितीमुळे शेतीपिकांचे व जनजीवनाचे प्रचंड नुकसान झाले आहे. सोयाबीन, कापूस, हळद, मुग-उडीद, भाजीपाला यासह अनेक पिकांचे होत्याचे नव्हते झाले आहे. शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत. दरम्यान, तरुणांमध्ये नदी-नाल्यावर उभे राहून फोटो व सेल्फी घेण्याची स्पर्धा सुरू असते. परंतु अशा ठिकाणी जाऊन फोटो काढणे धोकादायक असून जीवावर बेतू शकते, असे अधिकाऱ्यांनी स्...
error: Content is protected !!