Tehsildar Warkad ; पूराचे पाणी ओसरेपर्यंत पुलावरुन अथवा नदीच्या पाण्यातून वाहतूक करू नये-तहसीलदार वारकड
नांदेड l नांदेड जिल्ह्यात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे #आसनानदी ला मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पुराच्या पाण्यामुळे नांदेड – मालेगाव रस्त्यावरील पासदगाव येथील पुलावरून तसेच निळा – एकदरा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पासदगाव येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे श्री तांबे पोलीस निरीक्षक भाग्यनगर पोलीस स्टेशन हे स्वतः त्या ठिकाणी हजर होते.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचा उपाय म्हणून या दोन्ही पुलांच्या दोन्ही बाजूंना नदीपात्राजवळ बेरिकेडिंग करून वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली आहे. तसेच कोणत्याही अप्रिय घटनेची शक्यता लक्षात घेऊन पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पूरामुळे आसना नदीकाठावरील बोंढार, नेरली, एकदरा, पासदगाव, निळा, खुरगाव या गावांमधील शेतीमध्ये पाणी शिरल्याने काही प्रमाणात शेतपिकांचे नुकसान ...
