Nanded ; मसाप शाखा नांदेडच्या वतीने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप : विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर फुलले हास्य
नांदेड l मराठी साहित्य क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक साहित्यिकांच्या वतीने संकलित करण्यात आलेल्या निधीतून मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेड च्या वतीने मुखेड तालुक्यातील रावणगाव आणि हसनाळ येथील पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले . साहित्यिक देवीदास फुलारी , मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबितदार, उपाध्यक्ष दिगंबर कदम , कार्यवाह प्रा. महेश मोरे , सह कार्यवाह राम तरटे , कवी शिवाजी जोगदंड आदींची उपस्थिती होती.
मुखेड तालुक्यातील मुक्रमाबाद परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने या भागातील रावणगाव , हसनाळ आदी गावांना पुराच्या पाण्याचा प्रचंड फटका बसला होता. घरांची पडझड झाली . नागरिकांचे जनजीवन उध्वस्त झाले . खाण्यापिण्याचाही प्रश्न निर्माण झाला. पुराच्या पाण्यात संसार उपयोगी साहित्य वाहून गेले . याचवेळी विद्यार्थ्यांच्या शालेय साहित्यावरही पुराच्य...
