Saturday, June 27

Tag: Dhanegaon; Various religious programs organized

अळणी बुवा मठ तारातीर्थ, धनेगाव येथे 19 जानेवारी रोजी यात्रा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अळणी बुवा मठ तारातीर्थ, धनेगाव येथे 19 जानेवारी रोजी यात्रा; विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

नांदेड
नवीन नांदेड | पंचक्रोशीतील प्रसिध्द असलेल्या अळणी बुवा मठ तारातीर्थ, संत गौतमेश्वर संत संगम, धनेगाव येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, 19 जानेवारी रोजी भव्य यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेनिमित्त भाविकांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. यात्रेच्या दिवशी सकाळी 5 ते 8 वाजेदरम्यान रुद्राभिषेक संपन्न होणार असून 1008 श्री यदुबन महाराज कौलंबी आणि श्री आनंदबन गंभीरबन महाराज यांच्या पावन हस्ते हा विधी पार पडणार आहे. त्यानंतर सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत गुरुवाणी व गुरुपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांसाठी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 12 ते 3 या वेळेत किर्तनसेवेचे आयोजन असून या किर्तनात तारातीर्थ महात्मा ह.भ.प. सखाराम महाराज सुकळीकर आणि ह.भ.प. हरी महाराज येळेगावकर आपल्या अमृतवाणीने उपस्थित भक्तगणांना मार्ग...
error: Content is protected !!