Shri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज
नांदेड l संसाराची आसक्ती सोडून आणि लोभ, मोह, माया आदींचा त्याग करुन भगवान भक्तीमध्ये रममाण होणे हाच खरा धर्म आहे, असे प्रतिपादन गोडीया वैष्णवाचार्य परमश्रध्देय श्री युगलशरणजी महाराज अहिल्यानगर यांनी आज येथे केले.
नांदेड येथील स्व.रामनाथ बजाज व स्व.रुख्माबाई बजाज यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सत्यनारायण बजाज व बजाज परिवार (किनीवाला) नांदेड यांच्या पुढाकारातून माहेश्वरी समाजाच्या वतीने माहेश्वरी भवन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सुरु आहे. या यज्ञात दुसरे पुष्प गुंफताना युगलशरणजी महाराज (अहिल्यानगर) यांनी उपरोक्त प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, माणूस आणि प्राणी यात एक महत्वाचा फरक असा आहे की, माणसाला भक्ती करता येते, भावना समजते, आपल्याला ज्यांनी निर्माण केले, त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची प्रवृत्ती माणसात असते. प्राण्यांमध्ये यापैकी काहीही नसते. म्हणूनच मनुष्य जन्म दिल्याबद्दल...
