Bhimrao Keram ; गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाचा विकास करा आ.भीमराव केराम यांची लक्षवेधी
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l नागपूर नगरीचे संस्थापक गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधीचे संवर्धन करण्यासाठी ९ कोटी ७२ लाखांचा आराखडा नागपूर सुधार प्रन्यासने राज्य शासनाकडे पाठविला, त्याला नऊ महिन्यांपेक्षा अधिकचा कालावधी उलटूनही तिथला विकास झाला नाही.
त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात निधी मंजूर करावा आणि सक्करदरा येथे असलेल्या या समाधी स्थळाच्या कामाला गती द्यावी अशी मागणी आ.भीमराव केराम यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून केली आहे.
गोंडराजे बख्त बुलंदशाह यांच्या समाधी स्थळाचा विकास करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने संवर्धनाची प्रक्रिया हाती घेतली.परंतु त्या कामी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या त्या दूर करून समाधीचे संवर्धन होऊन नागपूरचा इतिहास सर्वांना माहिती व्हावा. यासाठी हा प्रकल्प पूर्णत्वास जाणे आवश्यक असल्याचे आ. भीमराव केराम यांनी आपल्या लक्षवेधित म्हटले आहे.तसेच नागप...
