Leopard Death Case : बिबट्या मृत्यू प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी तीव्र
नांदेड, अनिल मादसवार| किनवट तालुक्यातील सारखणी घाटातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह रहस्यमयरीत्या गायब झाल्याने संताप उसळला आहे.
वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची जबाबदारी असताना कर्तव्यच्युती केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक जी. डी. गिरी आणि मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी ‘अन्याय प्रतिकार दल’ आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी केली आहे.
या संदर्भात संस्थापक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पर्यावरण बचाव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना निवेदन दिले. प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास १३ डिसेंबरपासून विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा तलवारे यां...

