Monday, July 6

Tag: CPI(M) protests against government and private hospitals

CPI(M) protests ; शासकीय आणि खाजगी दवाखान्याच्या विरोधात माकपची निदर्शने

CPI(M) protests ; शासकीय आणि खाजगी दवाखान्याच्या विरोधात माकपची निदर्शने

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड l मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नागपंचमीच्या दिवशी २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड येथील अधिष्ठाता यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आला. २० जुलै रोजी एक दलित कुटुंबातील महिला प्रसूतीसाठी विष्णुपुरी येथील शासकीय दवाखान्यात दाखल झाली होती. तीची प्रसूती झाल्यावर त्या महिलेला बेड मिळाला नाही. किंबहुना त्या माहिलेला नवजात बाळासह जमिनीवर बराच वेळ टाकण्यात आले. या अनुषंगाने माकप तालुका कमिटी सभासद कॉ.श्याम सरोदे यांनी समाज माध्यमावर एक पोस्ट टाकली होती. त्या पोस्ट वर संतापून विष्णुपुरी येथील नामांकित शासकीय दवाखान्यातील अधिष्ठाता श्री सुधीर देशमुख यांनी मोबाईल फोन करून कॉ.सरोदे यांना धमकीवजा बोलून दवाखान्यात येऊन भेटा अन्यथा कार्यवाही करण्यात येईल असे धमकाव...
error: Content is protected !!