Citizens had great success : पुराच्या पाण्यात अडकलेल्या व्यक्तीला दोरीच्या साह्याने काढण्यात नागरिकांना मोठे यश -NNL
किनवट, परमेश्वर पेशवे| गोंडजेवली या नाल्याला अचानक पूर आल्याने या पुराच्या पाण्याच्या प्रवाहात पापन्ना देवकर हा वयोवृद्ध व्यक्ती वाहून गेला.. मात्र "वेळ आली पण काळ आला नव्हता" यांचे प्रत्यय अक्षरक्षा पाहायला मिळाले.
या पुराच्या पाण्यामध्ये हा वयोवृद्ध व्यक्ती अडकला आणि उंच गोट्याचा सहारा घेत त्या गोट्यावर थांबला लोकांच्या मदतीने दोरीच्या साह्याने या पुरात अडकलेल्या वयोवृद्ध व्यक्तीला पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात येथील नागरिकांना मोठे यश आले आहे. अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील गोंडजेवली पुलावर 19 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी पावणेदोन च्या सुमारास घडली आहे.
किनवट तालुक्यातील आप्पारावपेठ येथील नागरिकांनी या गोड जेवली पुलाची उंची वाढवून द्यावी अशी जिल्हा प्रशासनाकडे अनेक वेळा मागणी केली. या पुलाला तत्कालीन जिल्हाधिकारी विपिन विटणकर. माजी खासदार हेमं...
