Friday, June 26

Tag: Children of deceased in fifth double Dalit woman murder case submit statement to Superintendent of Police

पाचोंदा दुहेरी दलित महिला हत्याकांडातील मयताच्या मुलांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

पाचोंदा दुहेरी दलित महिला हत्याकांडातील मयताच्या मुलांनी दिले पोलीस अधीक्षकांना निवेदन

नांदेड, क्राईम
नांदेड l २० नोव्हेंबर रोजी माहूर तालुक्यातील दोन दलित महिलांची दागिने लुटून,गळा आवळून हत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असून नांदेड व यवतमाळ जिल्हा पूर्णतः हादरला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून काही तासातच दोन्ही आरोपीना अटक केली असल्यामुळे दोन्हीही मयताच्या मुलांनी पोलीस अधीक्षक आणि पोलीस खात्याचे आभार मानले आहेत. मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत ह्या दोघी सख्या जावा असून दलित प्रवर्गातील असल्यामुळे व मारेकरी जवळच्या गावातील असल्यामुळे व त्यांची नेहमीच पाचोंदा येथे येजा असल्यामुळे तो मयत महिलांना पूर्वीपासून ओळखत होता. आरोपीना मयताची जात माहिती होती म्हणून गुन्ह्यात वाढ करून ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवावीत व खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फासीची शिक्षा देण्यात यावी अशी लेखी मागणी मयत मातांच्या दोन्ही मुलां...
error: Content is protected !!