Allocation of hearing aids : राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत जन्मजात बहिरेपणा असलेल्या 70 बालकांना श्रवणयंत्र वाटप -NNL
नांदेड| जन्मजात बहिरेपणाचा आजार असलेल्या व श्रवण शक्ती कमी असलेल्या 116 बालकांची तपासणी जिल्हा रुग्णालय नांदेड येथे यशश्री कान नाक घसा हॉस्पिटल मिरज सांगली येथील डॉ. गीता कदम व त्यांचे सहकारी यांच्यामार्फत सोमवार 5 ऑगस्ट रोजी करण्यात आले. यापैकी 6 बालकांना कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे निष्पन्न झाले असून त्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित कमी प्रमाणात ऐकू येणाऱ्या 70 बालकांना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांच्या हस्ते श्रवणयंत्र वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे बालकांची श्रवण शक्ती वृद्धिंगत होण्यास मदत होणार असल्याने पालकांमधून समाधान व्यक्त केल्या जात आहे.
या शिबिरासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत आणि जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, अति...
