Plantation of trees at Bharat Vidyalaya and Shaktinagar Parisam | हरित नांदेड अभियाना अंतर्गत वजिराबाद झोन तर्फे भारत विद्यालय व शक्तीनगर परीसर येथे वृक्षारोपन -NNL
नांदेड| पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने शहरामध्ये एकुण 25000 वृक्षांची लागवड करण्याचे उदिष्ट समोर ठेवले असुन क्षेत्रिय कार्यालय क्र.4 वजिराबाद अंतर्गत गुरुपोर्णीमेचे औचित्य साधुन भारत विद्यालय येथे गुरुपोर्णीमा व वृक्ष लागवडीचा संयुक्तकार्यक्रम भारत विद्यालयाच्या परीसरात संपन्न झाला.
भारत विद्यालयातील मुख्याद्यापक, शिक्षक व विद्यार्थी यांनी वृक्ष लावुन त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्विकारली असुन कार्यक्रमादरम्यान सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांनी विद्यार्थ्याना वृक्षाचे महत्व पटवुन दिले. याप्रसंगी मुख्याद्यापक साहेबराव चव्हाण यांनी विद्यार्थ्याना वृक्ष लावण्याचे आवाहन करुन लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन शाळेतील विद्यार्थी व शिक्षकवृंद करतील असे अस्वस्थ केले. भारत विद्यालय परीसरात 160 झाडे वृक्षारोपन करण्यात येत आहेत.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम क...
